देणगी देण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा

देणगीदार

कालिका मंदिर पुरातन काळापासून अत्यंत जागृत व नवसास पावणारे देवस्थान म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. त्यामूळे देवीला अनेक भाविक नवसपुर्ती म्हणुन चांदिचे, सोण्याचे हात, पाय, दागिने अर्पण करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून विश्वस्त मंडळीनी अशा चांदी सोन्यातुन चांदीचे नवे दागिने व मुकूट घडवले आहेत. तसेच दरवर्षी नवरात्रात जवळपास ५० ते ६० पोते धान्य येते. आलेले सर्व धान्य गरीबांना तसेच अंधशाळा, रिमांड होम, प्रबोधन मंदिर, स्त्रीआधार केंद्र, कर्ण बधिरांची शाळा, अनाथ बालकाश्रम यांना दान करण्यात येते. आज पर्यत संस्थेने भूकंपग्रस्तासाठी मदत, सिडको परिसरात संस्थेने विनाअनुदान तत्वावर बालवाडी, प्राथमिक वर्ग सुरु केले आहेत. तसेच टेक्निकल स्कूल, अभियांत्रिकी कॉलेज, धर्मार्थ दवाखाना, रुग्णवाहिका तसेच मंदिराच्या बाजुला २६ रुम्स काढण्याचा संस्थेचा मानस आहे.
आपल्याला श्री कालिका मंदिराच्या विस्तारासाठी मदत करवयाची असल्यास "श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट ” या नावाने धनादेश खालील पत्यावर पाठवावा .
"श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट ” पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ३२६ अ, स्वामी रामकृष्ण परमहंस मार्ग , जुना आग्रारोड , नाशिक. - १ फोन : (०२५३) २५७७९३७